Chiku Benefits : फक्त गोड नाही, 'चिकू' आहे फायद्यांची खाण

पुढारी वृत्तसेवा

चिकू हे दक्षिण अमेरिकेतून भारतात आलेले बदामी रंगाचे आणि मधुर चवीचे असणारे फळ आहे.

एप्रिल ते ऑक्टोबर या महिन्यांत चिकूच्या झाडाला दोन-दोन आणि चार-चारच्या झुमक्यात फळे येतात.

भारतामध्ये गुजरात, महाराष्ट्र, बिहार, बंगाल आणि उत्तर प्रदेशात चिकूचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

चिकूमध्ये पाणी, प्रथिने, चरबी, कार्बोहायड्रेट्स, शर्करा यांसह जीवनसत्त्व 'ए' आणि 'सी' भरपूर प्रमाणात असते.

चिकू खाल्ल्याने शरीरात पटकन उत्साह संचारतो. आतड्यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.

चिकू खाल्ल्याने पित्तप्रकोप शांत होतो.

नेहमी व्यवस्थित पिकलेले चिकूच खावेत, कारण कच्चे चिकू खाल्ल्याने मलबद्धता किंवा पोटदुखी होऊ शकते.

चिकूच्या झाडाच्या डिंकाचा (च्युइंगम) वापर लहान वस्तू चिकटवण्यासाठी आणि डेन्टल सर्जरीमध्ये केला जातो.

चिकू झाडाचे लाकूड कठीण आणि टिकाऊ असते, तर त्याची साल शक्तिवर्धक, तापनाशक आणि रंगकामासाठी वापरली जाते.