Spider Webs | 'हे' सोपे उपाय केल्यास घरात कोळ्याचे जाळे होणार नाही

अविनाश सुतार

वुल्फ स्पायडर (Wolf Spider) जाळी विणत नाहीत, ते स्वतः शिकार करतात. ते केसाळ, पट्टेदार आणि सुमारे दोन इंच लांब असतात. ते चपळ असून गॅरेज, अंगणात आढळतात

सेलर स्पायडर (Cellar Spider) हे कोळी जाळी विणतात आणि त्या जाळीतच राहतात. त्यामुळे जाळी काढून जागा स्वच्छ केल्यास ते परत येण्याची शक्यता कमी होते

जिथे जाळी दिसते, तिथे ती ब्रशने काढून व्हॅक्यूम करून टाका. त्यामुळे जाळीसोबत कोळी आणि त्यांच्या अंड्यांचाही नायनाट होतो

जाळी विणणारे कोळी सुरक्षित जागा शोधतात. त्यामुळे खेळणी, लाकूड, पाने, कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे त्यांना योग्य ठिकाण मिळते. अशा गोष्टी काढल्यास अंगणाभोवती कोळ्यांचा वावर कमी होतो

दरवाजे-खिडक्या बंद ठेवूनही कोळी भेगांमधून आत येऊ शकतात. त्यामुळे प्रवेशद्वार, अटारी, तळघर तपासा आणि सर्व भेगा नीट सील करा

साचलेले पाणी आणि ओलसरपणा अनेक कीटकांना आकर्षित करतात आणि यामुळेच शिकार करणारे कोळीही येतात, बागेतील कुंड्या, कचरापेट्या कोरड्या ठेवा

बाहेरील दिवे कीटकांना आकर्षित करतात आणि हेच ठिकाण जाळी विणणाऱ्या कोळ्यांना आवडते. शक्य असल्यास दिवे बंद ठेवा, जाळी दिसल्यास लगेच काढा

जाळी विणणारे कोळी धुळीच्या आणि कमी वापरल्या जाणाऱ्या जागांमध्ये राहणे पसंत करतात. त्यामुळे घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवणे हा उत्तम उपाय आहे

शिकार करणारे कोळी अन्नाच्या शोधात भटकतात. त्यामुळे सर्व खिडक्या-दरवाजे व्यवस्थित बंद करून भोके मुजवून टाकावीत

येथे क्लिक करा