Moringa Tree Hair Benefits | 'या' चमत्कारिक झाडामुळे केस होतील सुंदर, चमकदार, काळेभोर

अविनाश सुतार

(Moringa oleifera) शेवग्याच्या झाडामधील पोषक घटक निस्तेज, कमकुवत केसांना दाट, मजबूत आणि चमकदार बनवू शकतात

शेवग्याला “चमत्कारिक झाड” म्हणून ओळखले जाते, याचे कारण म्हणजे त्याची पाने, शेंगा, बिया जीवनसत्त्वे आणि खनिजांनी परिपूर्ण आहेत

यात विशेषतः व्हिटॅमिन A, C, झिंक आणि आयर्न मुबलक प्रमाणात असतात, हे सर्व केस वाढीसाठी महत्त्वाचे घटक आहेत

व्हिटॅमिन A टाळूला ओलावा देते आणि कोंडा किंवा कोरडेपणा होण्यापासून वाचवते

व्हिटॅमिन C कोलेजन तयार करण्यात मदत करते, जे केसांना मजबुती देण्याचे काम करते

झिंक आणि आयर्न टाळूतील रक्ताभिसरण सुधारतात, ज्यामुळे केसांच्या मुळांपर्यंत पोषण पोहोचते

अनेक हेअर केअर ब्रँड्स त्यांच्या शँपूमध्ये आणि मास्कमध्ये शेवग्याचे तेल आणि अर्क वापरतात

शेवग्याचा रस अल्कलाइन आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणांनी युक्त असल्याने तो शरीरातील विषारी घटक बाहेर काढतो

मजबूत केसांची मुळे, कमी केसगळती आणि नैसर्गिक तेज वाढविण्यासाठी शेवगा गुणकारी ठरतो

येथे क्लिक करा