पुढारी वृत्तसेवा
भेसळयुक्त तुपाच्या काळात घरच्या घरी शुद्धता तपासण्यासाठी या काही सोप्या आणि प्रभावी टिप्स नक्की फॉलो करा.
हातावर घासून पहा
थोडं तूप तळहातावर घेऊन घासल्यास जर ते त्वचेत शोषले गेले आणि छान सुगंध आला, तर ते तूप शुद्ध आहे.
गरम करून तपासा
तूप गरम केल्यावर जर ते लगेच विरघळून गडद तपकिरी रंगाचे झाले, तर ते शुद्ध आहे; पिवळसर झाल्यास त्यात भेसळ असू शकते.
पाण्याचा वापर
एका ग्लास पाण्यात एक चमचा तूप टाका. जर तूप पाण्यावर तरंगले, तर ते शुद्ध आहे आणि खाली बसल्यास त्यात भेसळ आहे.
रंग आणि कणीदारपणा
शुद्ध गाईचे तूप दाणेदार (Granular) असते आणि त्याचा रंग हलका पिवळसर असतो.
मिठाची चाचणी
तुपात थोडे मीठ आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड मिसळल्यास जर त्याचा रंग लाल झाला, तर समजावे की त्यात वनस्पती तूप मिसळले आहे.
फ्रिजमध्ये ठेवून पहा
तूप फ्रिजमध्ये ठेवा. जर ते पूर्णपणे एकाच थरात गोठले, तर ते शुद्ध आहे; वेगवगेळे थर दिसल्यास त्यात तेलाची भेसळ असू शकते.
वासावरून ओळख
शुद्ध तुपाचा सुगंध अतिशय नैसर्गिक आणि मनमोहक असतो, जो बराच वेळ टिकून राहतो.
आयोडीन टेस्ट
विरघळलेल्या तुपात दोन थेंब आयोडीन टाकल्यास जर रंग निळा झाला, तर त्यात बटाटा किंवा स्टार्चची भेसळ असल्याचे स्पष्ट होते.