पुढारी वृत्तसेवा
तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी पिणे ही भारतीय संस्कृतीतील एक जुनी परंपरा आहे.
तांब्याच्या भांड्यात रात्रभर ठेवलेले पाणी प्यायल्याने शरीरातील वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांचे संतुलन राखण्यास मदत होते.
हे पाणी पचनक्रिया सक्रिय करते आणि पोटदुखी, गॅस किंवा अपचनासारख्या समस्या दूर करण्यास मदत करते.
तांब्यामध्ये नैसर्गिकरित्या बॅक्टेरिया नष्ट करण्याचे गुणधर्म असल्याने, हे पाणी संसर्गजन्य आजारांपासून शरीराचा बचाव करते.
तांब्यातील अँटी-ऑक्सिडंट्समुळे चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडत नाहीत आणि त्वचा तजेलदार दिसते.
पाण्याचा पूर्ण लाभ मिळवण्यासाठी ते तांब्याच्या भांड्यात किमान ८ ते १० तास साठवून ठेवणे आवश्यक असते.
तांब्याच्या पाण्याचे अतिसेवन केल्यास शरीरात तांब्याचे प्रमाण वाढून मळमळ किंवा उलट्यांसारखे त्रास होऊ शकतात.
तांब्याची भांडी नियमितपणे लिंबू आणि मिठाने स्वच्छ करावीत, अन्यथा त्यावर जमा झालेला हिरवा थर शरीरासाठी घातक ठरू शकतो.
तांब्याच्या भांड्यात कधीही लिंबू पाणी, ताक किंवा कोणतेही आंबट पदार्थ ठेवू नयेत, कारण त्यामुळे विषबाधा होण्याची शक्यता असते.