पुढारी वृत्तसेवा
मानसिक आरोग्याची रोज निगा राखणे गरजेचे आहे. सकाळी उठल्यावर आपण करत असलेल्या गोष्टींचा थेट परिणाम आपल्या संपूर्ण दिवसावर आणि मनावर होतो.
दिवसाची सुरुवात आनंदाने करण्यासाठी सकाळी उठल्या उठल्या चांगल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. यामुळे मनात सकारात्मक विचार निर्माण होतात.
सकाळी काही वेळ शांत बसून दीर्घ श्वास घेतल्याने मन शांत होते. दिवसभराच्या कामांसाठी एक प्रकारचा संयम मिळतो.
सकाळी योगासने, स्ट्रेचिंग किंवा थोडा वेळ चालण्याने शरीरातील आळस निघून जातो आणि स्नायू मोकळे झाल्यामुळे प्रसन्न वाटते.
कोवळ्या उन्हात बसा सकाळचा नैसर्गिक प्रकाश आणि सूर्यप्रकाश घेतल्याने शरीराचे चक्र सुधारते आणि रात्री झोपही चांगली लागते.
सकाळी उठल्यावर चहा-कॉफी घेण्यापूर्वी किमान एक ग्लास पाणी प्या. यामुळे शरीर ताजेतवाने होते आणि मेंदूला तरतरी मिळते.
सकाळी दिवसाचे नियोजन करा. आज काय करायचे आहे, याची एक छोटी यादी किंवा मनाशी नियोजन करा. यामुळे गोंधळ उडत नाही आणि दिवसभराचे काम सोपे होते.
सातत्य ठेवा मानसिक आरोग्यात बदल घडवण्यासाठी या सवयी फक्त एक दिवस करून चालणार नाही, तर त्यामध्ये सातत्य ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.