पुढारी वृत्तसेवा
अभ्यास करताना लक्ष विचलित होणे टाळण्यासाठी, अभ्यासाचा दर्जा सुधारण्यासाठी कठोर परिश्रम नाही, तर काही सोप्या युक्ती वापरणे आवश्यक आहे.
अभ्यासासाठी घरात एक शांत आणि निश्चित जागा निश्चित करा.
एकाच ठिकाणी बसून अभ्यास केल्याने आपल्या मेंदूला त्या जागेची सवय होते. परिणामी, त्या विशिष्ट जागी बसताच मेंदू आपोआप एकाग्रतेशी जोडला जातो.
अभ्यासादरम्यान तुमचा फोन सर्वात मोठा अडथळा ठरतो. फोन सायलेंट किंवा एअरप्लेन मोडवर ठेवून स्वतःपासून दूर ठेवा.
अभ्यासाचा डोंगर एकाच वेळी सर करण्याऐवजी त्याची विभागणी लहान ध्येयांमध्ये करा. स्पष्ट उद्दिष्टे ठेवून छोटी सत्रे पूर्ण करणे सोपे आणि आनंददायी असते.
सतत तासनतास वाचण्यापेक्षा २५-३० मिनिटांचा अभ्यासाचा नियम पाळा. प्रत्येक सत्रानंतर छोटा ब्रेक घेतल्याने मन ताजेतवाने राहते आणि ग्रहणशक्ती वाढते.
व्हिडिओ पाहणे किंवा चॅटिंग करत अभ्यास करणे टाळा. एका वेळी दोन कामे केल्याने एकाग्रता भंग पावते. लक्षात ठेवा, एका वेळी एकच काम केल्यास उत्तम रिझल्ट मिळतो.
अभ्यासाच्या मधल्या सुट्टीत सोशल मीडिया स्क्रोल करण्याऐवजी थोडे स्ट्रेचिंग करा, पाणी प्या किंवा घरात फेरफटका मारा. यामुळे तुमच्या मेंदूला खरी विश्रांती मिळते.