मोबाईल जॅमर युनिट म्हणजे काय? 'हे' कसे कार्य करते?

मोनिका क्षीरसागर

मोबाईल जॅमर म्हणजे काय?

मोबाईल जॅमर हे एक असे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे जे ठराविक परिसरात मोबाईल सिग्नल रोखण्यासाठी वापरले जाते.

हे कसे कार्य करते?

हे उपकरण मोबाईल टॉवर आणि मोबाईल फोन यांच्यातील संवाद खंडित करण्यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी सिग्नल उत्सर्जित करते.

सिग्नलमध्ये अडथळा

जॅमर त्याच फ्रिक्वेन्सीवर सिग्नल पाठवतो ज्यावर मोबाईल काम करतो, ज्यामुळे फोनला नेटवर्क मिळत नाही आणि तो 'No Service' दाखवतो.

कव्हरेज एरिया (रेंज)

जॅमरची क्षमता त्याच्या पॉवरवर अवलंबून असते; काही जॅमर काही मीटर तर काही मोठ्या परिसराचे सिग्नल जाम करू शकतात.

कॉल आणि इंटरनेट दोन्ही बंद

जेव्हा जॅमर चालू असतो, तेव्हा तुम्ही ना कॉल करू शकता, ना इंटरनेट वापरू शकता; सर्व वायरलेस सेवा तात्पुरत्या ठप्प होतात.

कुठे केला जातो वापर?

सुरक्षेच्या कारणास्तव कारागृह, संवेदनशील सरकारी कार्यालये, परीक्षा केंद्र आणि लष्करी भागात याचा वापर केला जातो.

का आहे आवश्यक?

गोपनीयता राखण्यासाठी आणि रिमोट कंट्रोलने होणारे स्फोट किंवा गैरप्रकार रोखण्यासाठी जॅमर अत्यंत महत्त्वाचे साधन आहे.

कायदेशीर नियम

सामान्य नागरिकांना जॅमर वापरण्याची परवानगी नसते; याचा अनाधिकृत वापर करणे हा भारतात कायदेशीर गुन्हा आहे.

येथे क्लिक करा...