Uric Acid : यूरिक ॲसिड वाढल्याच्‍या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका! वेळीच सावध व्हा

पुढारी वृत्तसेवा

शरीरातील यूरिक  ॲसिड (Uric Acid) पातळीकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.

रात्रीच्या वेळी पायाच्या अंगठ्यात अचानक, तीव्र वेदना आणि सूज येणे हे हे यूरिक ॲसिड वाढल्याचे लक्षण असू शकते.

कोणत्याही स्पष्ट दुखापतीशिवाय सांधे लालसर दिसणे, गरम जाणवणे.

सकाळी उठल्यावर सांध्यांमध्ये विशेषत: तीव्र कडकपणा जाणवणे. नियमित हालचाल करणे कठीण होते.

कोणतेही स्पष्ट कारण नसताना सतत थकवा किंवा अशक्तपणा जाणवणे.

कमरेच्या खालच्या भागात किंवा बाजूला मंद किंवा तीव्र स्वरूपाची वेदना हे यूरिक ॲसिडचे प्रमाण वाढल्याचे लक्षण असू शकते.

वारंवार लघवी होणे, मूत्राचा रंग बदलणे किंवा लघवी करताना वेदना होणे हे मूत्रमार्गात ॲसिडचे स्फटिक जमा होण्याचे संकेत असू शकते.

हळूहळू सांध्यांची लवचिकता कमी होणे आणि हालचालींवर मर्यादा यूरिक ॲसिड तयार होत असल्याचे सूचित करते.

टीप : वरील माहिती केवळ मार्गदर्शन म्हणून विचारात घ्यावी.कोणत्याही उपायांचा वापर करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

येथे क्‍लिक करा