अविनाश सुतार
चातुर्मास काळात विवाह, गृहप्रवेश, यज्ञ, धार्मिक विधी यांसारखी शुभ कार्ये थांबवतात. देवउठणी एकादशीपासून पुन्हा सर्व शुभ कार्यांना प्रारंभ करता येतो
देवउठणी एकादशीचा उपवास केल्याने अत्यंत पुण्य प्राप्त होते, असे धर्मग्रंथ सांगतात. या उपवासाचे फळ अनेक यज्ञांच्या बरोबरीचे मानले जाते
उत्पन्ना एकादशी नवे आध्यात्मिक प्रारंभ, भक्तीचे संकल्प आणि अंतःशुद्धीचे प्रतीक मानली जाते
स्वच्छता, संकल्प, पूजा, उपवास आणि भगवान विष्णूप्रती भक्ती या स्वरूपाचा व्रताचार ठेवावा
ही एकादशी नवे संकल्प घेण्यासाठी उत्तम मानली जाते. या दिवशी आध्यात्मिक किंवा सामाजिक सेवेसाठी नवा निश्चय करणे शुभ असते
सकाळी लवकर स्नान करून व्रत पाळण्याचा संकल्प करावा
घरात किंवा पूजास्थळी स्वच्छता करून भगवान विष्णू (आणि माता लक्ष्मी असल्यास) यांची पूजा करावी.
तुळशीची पाने, पिवळी फुले आणि फळे अर्पण करावीत. शक्य असल्यास विष्णू सहस्रनाम किंवा “ॐ नमो भगवते वासुदेवाय” हा मंत्र जपावा
संपूर्ण उपवास किंवा अंशतः उपवास ठेवावा. काही भक्त धान्य, तांदूळ वगैरे टाळतात आणि हलके सात्त्विक अन्न ग्रहण करावे