Arboreal Animals | झाडांवर आयुष्य घालवणारे '९' वृक्षवासी प्राणी

पुढारी वृत्तसेवा

कोआला (Koala)

कोआला पूर्व ऑस्ट्रेलियातील युकॅलिप्टसच्या जंगलांमध्ये राहतात, तीन फूट उंची असलेले त्यांचे शरीर राखाडी-तपकिरी व मऊ केसांनी झाकलेले असते. आयुष्य झाडांवर घालवतात

रफ ग्रीन साप हे दक्षिणपूर्व अमेरिकेत आढळणारे वृक्षवासी साप आहेत. त्यांचा रंग चमकदार हिरवा आणि पोट फिकट रंगाचा असते. 32 इंच लांब वाढतात. कोळी, टोळ, कीटक खातात. नद्यांजवळ, गोड्या पाण्याच्या भागात आढळतात

तीन बोटांचा स्लॉथ हा सर्वात संथ हालचाल करणारा वृक्षवासी प्राणी आहे. बहुतेक वेळ झाडांवर किंवा गोड्या पाण्याच्या तळ्यां, नद्यां आणि दलदलीत पोहत घालवतात

बिबट्या हा आफ्रिकेतील सर्वात मोठे मांजर आहे. तो जमिनीवर आणि झाडांवर दोन्हीकडे राहतात. झाडांवर चढण्याच्या क्षमतेमुळे ते मोठ्या शिकाऱ्यांपासून वाचतात आणि आपले भक्ष्य शांततेत खातात

किंकाजू हे गोंडस आणि अनोख्या दिसणाऱ्या वृक्षवासी प्राण्यांपैकी एक आहेत. झाडांवर राहणारे प्राणी मध्य आणि दक्षिण अमेरिकेत आढळतात. मध, फळे, अंडी आणि कीटक खातात

हॉलर माकड हे सर्वात प्रसिद्ध वृक्षवासी माकडांपैकी एक आहे. हे प्राणी फक्त दक्षिण आणि मध्य अमेरिकेत आढळतात आणि आपले आयुष्य झाडांच्या टोकांवर घालवतात

आय-आय हे जगातील सर्वात विचित्र प्राण्यांपैकी एक आहेत. हे वृक्षवासी प्राणी असून फक्त मादागास्करच्या जंगलांमध्ये आढळतात. हे जंगल जलदगतीने नष्ट होत असल्याने त्याच्या अधिवास धोक्यात आला आहे

ट्री कांगारू हे कांगारूंसारखे जमिनीवर नव्हे, तर ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशियातील जंगलांमध्ये झाडांवर राहतात. साप, पक्षी, अंडी, कडधान्ये, झाडांची साल आणि रस खातात

ओरांगुटान हे पृथ्वीवरील सर्वात धोक्यातील वृक्षवासी प्राण्यांपैकी एक आहेत. ते इंडोनेशियात आढळता. पाम तेलाच्या शेतीसाठी होणाऱ्या जंगलतोडीमुळे त्यांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला आहे

येथे क्लिक करा