Namdev Gharal
मादागास्कर देशामध्ये अनेक अजूबे पाहायला मिळतात. यामध्येच एक आहे सिफाका लेमूर sifaka lemur आहे. ही वानरकुळातील एक प्रजाती आहे.
या लेमरचे वैशिष्ट्य म्हणजे हा जमिनीवर चालताना तो नाचणाऱ्या माणसासारखा बाजूने उड्या मारत चालतो. हा पृथ्वीवरील एकमेव असा प्राणी आहे जो अशी चाल करतो.
एका दमात ४५ फूट उडी! काही सिफाका लमार 40–45 फूट अंतराची उडी एका झाडावरून दुसऱ्यावर मारू शकतात. त्यामुळे त्याच्या पायांमध्ये नैसर्गिक ‘स्प्रिंग’ आहेत का असा भास होतो
हा फक्त मॅडागास्करमध्येच आढळतो हा प्राणी पृथ्वीवर अन्य कुठेही नाही. तो जगातील अत्यंत दुर्मिळ प्राइमेटपैकी एक आहे.
हिवाळ्यात “सोलर बाथ” घेतो हिवाळ्यात सकाळी हे लमार छाती सूर्याच्या दिशेने करून हात पसरवून बसतात जणू काही योगासन करत आहेत.
सिफाका लमारचा आवाज "शिफाक-शिफाक" असा येतो. याच आवाजावरून त्याचे नाव “Sifaka” पडले.
धोकादायक उड्या मारते पण पडत नाही तो दगडावरून किंवा झाडावरून उडी मारताना त्याचा कधीही तोल जात नाही
त्याचे पंजे हे मोठे व चांगली पकड घेतात. तर याची शेपूट ही त्याच्या शरिरापेक्षा लांब असतात.
त्याच्या मागील पायांचे muscles खूप शक्तिशाली असतात. मानवाच्या पायांच्या ताकदीपेक्षा ८–१० पट जास्त.
याचे शरीर 40–55 सेमी, तर शेपटी शरीरापेक्षा जास्त लांब असते. वजन: साधारण 3 ते 6 किलो असते याचा मुख्य आहार म्हणजे पाने, फळे असतो.