Namdev Gharal
Bullet Ant ही जगातील अशी मुंगी आहे की हिचा चावा म्हणजे बंदुकीतून गोळी लागल्यावर जेवढ्या वेदना होतील तेवढ्या वेदना एकाच दंशामध्ये होतात.
दक्षिण अमेरिकेतील अॅमेझॉन वर्षावनात ही मुंगी आढळते. प्रामुख्याने ब्राझील, निकाराग्वा, कोलंबिया, पेरू, व्हेनेझुएला, इक्वाडोर या देशांमध्ये हीचा रहिवास आहे.
लोक सांगतात की या मुंगीचा दंश घेतल्यावर गोळी लागल्यासारखी जळजळ आणि वेदना होते. या वेदना १२ ते २४ तासांपर्यंत टिकतात
हिची लांबी २.५ ते ३ सेंमी (सुमारे १ इंच) इतकी असते. रंग काळा-तपकिरी आणि शरीरावर मजबूत कवचासारखा बाह्यभाग असतो.
Bullet ant चा दंश मानवासाठी प्राणघातक नसतो, पण अत्यंत तीव्र वेदनादायक असतो.
ब्राझीलच्या “सातरे मावे” (Sateré-Mawé) या अमेझॉनमधील आदिवासी जमातीमध्ये बुलेट ॲन्ट मुंग्यांनी भरलेले हॅन्ड ग्लोज घालण्याचा "दीक्षा सोहळा" असतो.
या जमातीमध्ये असा समज आहे की जो व्यक्ती बुलेट ॲन्टच्या चाव्यांची तीव्र वेदना सहन करू शकतो, तो खरा योद्धा आणि प्रौढ पुरुष ठरतो.
या साठी मुंग्या आधी थोड्या वेळ बेशुद्ध केल्या जातात. त्या नंतर पानांच्या हातमोज्यांमध्ये उलट दिशेने ठेवतात
जेव्हा या मुंग्या शुद्धीवर येतात, तेव्हा तरुण मुलांना हे हातमोजे १० मिनिटे घालावे लागतात. मुंग्यांचे शेकडो डंख लागतात — तीव्र वेदना होते.
हात सुजतो, जळजळ होते, पण मुलं ती वेदना सहन करतात. हे धैर्य, शौर्य, आणि मानसिक ताकदीचे प्रतीक मानले जाते.
हिच्या चाव्यामध्ये poneratoxin नावाचे न्यूरोटॉक्सिन विष असते. हे स्नायू आणि नर्व्ह सिग्नलिंगमध्ये अडथळा आणते, त्यामुळे तीव्र वेदना आणि स्नायूंचे आकुंचन होतात.