अविनाश सुतार
प्रभावी अँटिऑक्सिडंट आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असलेले हळदीचे दूध आरोग्यदायी मानले जाते
“गोल्डन मिल्क” म्हणून ओळखले जाणारे हे दूध रोगप्रतिकारशक्ती वाढवते, सांधेदुखी कमी करते आणि सूज शांत करते
हळदीचे दूध अनेकांसाठी आरोग्यदायी असले तरी काही गटांतील लोकांनी ते टाळणे अधिक योग्य ठरते
हळद पित्तनिर्मिती वाढवते. त्यामुळे पित्ताशयातील खडे किंवा पित्तनलिकेतील अडथळा यांसारख्या समस्या अधिक बळावू शकतात. नियमित हळदीचे दूध पिल्याने वेदना वाढू शकतात
कर्क्यूमिनमध्ये नैसर्गिक रक्त पातळ करण्याचे गुणधर्म असतात. वॉरफरिन, अॅस्पिरिन किंवा क्लोपिडोग्रेलसारखी औषधे घेत असाल, तर हळदीचे दुधासोबत सेवन केल्यास रक्तस्राव वाढू शकतो
हळद शरीरातील लोह शोषणात अडथळा आणू शकते. त्यामुळे अॅनिमिया किंवा कमी हिमोग्लोबिन असलेल्या लोकांसाठी गंभीर ठरू शकते
हळदीत ऑक्सलेट्स असतात, जे कॅल्शियमसोबत मिळून मूत्रपिंडातील खडे तयार करू शकतात, त्यामुळे मुतखड्याचा त्रास असणाऱ्यांनी हळदीचे दूध पिणे टाळावे
अॅसिडिटी, अल्सर किंवा गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज असलेल्या लोकांमध्ये हळदीच्या दूधामुळे पोट फुगणे, छातीत जळजळ किंवा मळमळ वाढवू शकते
हळदीचे दूध जास्त प्रमाणात घेतल्यास गर्भाशय उत्तेजित होऊ शकते किंवा हार्मोनल संतुलनावर परिणाम होऊ शकतो