पुढारी वृत्तसेवा
शिळे अन्न खाणे ही अनेकांची सवय असते, पण ही सवय तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते.
अन्न शिजवल्यानंतर ठराविक काळानंतर त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात. त्यामुळे अशा अन्नातून शरीराला काहीही मिळत नाही.
शिळ्या अन्नामध्ये बॅक्टेरिया वेगाने वाढतात, ज्यामुळे फूड पॉयझनिंग, जुलाब आणि उलट्या यांसारखे त्रास उद्भवू शकतात.
शिळे अन्न पचायला जड असते. यामुळे गॅस, ॲसिडिटी आणि पोट फुगण्याच्या समस्या वारंवार जाणवू लागतात.
सतत शिळे अन्न खाल्ल्याने शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) कमकुवत होते, ज्यामुळे तुम्ही वारंवार आजारी पडू शकता.
ताजे अन्न ऊर्जा देते, तर शिळे अन्न खाल्ल्यानंतर शरीरात आळस आणि थकवा जाणवतो. यामुळे कामात लक्ष लागत नाही.
उन्हाळ्यात अन्न लवकर खराब होते. फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न पुन्हा पुन्हा गरम करून खाल्ल्याने त्यातील विषारी घटक वाढतात.
निरोगी राहायचे असेल तर नेहमी ताजे आणि गरम अन्न खाण्यालाच पसंती द्या. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे...