मोनिका क्षीरसागर
काय तुम्हाला माहिती आहे का? रागाच्या भरात केलेले भोजन तुमच्या शरीरासाठी विषासमान ठरू शकते.
आपण जेव्हा रागात असतो, तेव्हा शरीरात 'स्ट्रेस हार्मोन्स' वाढतात, ज्यामुळे अन्नाचे नीट पचन होत नाही.
चिडचिड किंवा संताप व्यक्त करत जेवल्याने पित्त वाढते आणि अपचन, गॅस यांसारख्या समस्या उद्भवतात.
राग शांत नसल्यास शरीर अन्नातील आवश्यक जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वे शोषून घेऊ शकत नाही.
रागात जेवल्याने हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढतो, ज्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
संशोधनानुसार, नकारात्मक मानसिक स्थितीत जेवल्याने 'ओव्हरईटिंग' होते, परिणामी वजन झपाट्याने वाढते.
आयुर्वेदानुसार, अन्नाचा पूर्ण लाभ मिळवण्यासाठी जेवताना मन प्रसन्न आणि शांत असणे अत्यंत आवश्यक आहे.
जर खूप राग आला असेल, तर आधी थोडे पाणी प्या, दीर्घ श्वास घ्या आणि मन शांत झाल्यावरच जेवायला बसा.