मोनिका क्षीरसागर
लोणचं साठवण्यासाठी नेहमी काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीलाच पसंती द्या
बरणी वापरण्यापूर्वी ती गरम पाण्याने धुवून कडक उन्हात पूर्णपणे वाळवून घ्या.
लोणचं काढताना कधीही ओल्या हाताचा किंवा ओल्या चमच्याचा वापर करू नका
लोणच्यामध्ये तेलाचे प्रमाण योग्य ठेवा; सर्व फोडी तेलात बुडलेल्या असाव्यात
लोणच्याला बुरशी लागण्यापासून वाचवण्यासाठी त्यात मीठ पुरेशा प्रमाणात टाका
लोणच्याची बरणी दमट जागेऐवजी कोरड्या आणि हवेशीर ठिकाणी ठेवा
या साध्या ट्रिक्स वापरून तुमचे लोणचे वर्षभर अगदी ताजे आणि चविष्ट राहील