पुढारी वृत्तसेवा
अॅसिडिटी प्रचंड वाढते
रिकाम्या पोटी चहातील कॅफीनमुळे पोटातील ऍसिड वाढते व आम्लपित्ताचा त्रास जास्त होतो.
गॅस, फुगलेपणा आणि ढेकर
उपाशी चहा पिल्यास गॅस तयार होतो, पोट फुगते आणि वारंवार ढेकर येतात.
पचन शक्ती कमजोर होते
कॅफीनमुळे आतड्यांच्या नैसर्गिक हालचाली बिघडतात, ज्यामुळे पाचन मंदावते.
मळमळ आणि उलट्यांचा त्रास
रिकाम्या पोटी चहा घेतल्यास मळमळ, हलके डोके फिरणे किंवा उलट्या होऊ शकतात.
भूक मंदावते
सकाळी नाश्ता करण्याऐवजी चहाने जठर भरल्यास भूक कमी होते आणि शरीराला हवी ती ऊर्जा मिळत नाही.
हार्मोनल असंतुलन वाढते
कॅफीन कोर्टिसॉल (Stress Hormone) वाढवतो, त्यामुळे मूड स्विंग्स व तणाव वाढू शकतो.
थकवा आणि चिडचिड वाढते
चहा तात्पुरती उर्जा देतो पण नंतर शरीर आणखी थकते याला “caffeine crash” म्हणतात.
लोह (Iron) शोषण घटते
रिकाम्या पोटी चहा घेतल्याने शरीर लोह शोषत नाही; विशेषतः महिलांना याचा त्रास जास्त.
पोटात जळजळ आणि क्रॅम्प्स
चहा आणि कॅफीनमुळे पोटाचे आवरण दुखावते, ज्यामुळे जळजळ, वेदना आणि क्रॅम्प्स होऊ शकतात.