Anirudha Sankpal
भारतातील बहुतांश लोकांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते, मात्र सकाळी रिकाम्या पेट चहा पिणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते.
रिकाम्या पोटी गरम चहा प्यायल्याने पोटाचे आरोग्य बिघडते आणि दिवसभर गॅस, ॲसिडिटी व पोट फुगणे यांसारख्या समस्या जाणवतात.
सकाळी शरीरात स्ट्रेस हार्मोन्स वाढलेले असतात, अशा वेळी चहातील कॅफिनमुळे ताण (Stress) आणि एंग्जायटी आणखी वाढू शकते.
रिकाम्या पोटी चहा पिण्याच्या या सवयीमुळे आरोग्याला अपाय होऊन पुढे मधुमेह (Diabetes) होण्याचा धोकाही वाढतो.
यावर सोपा उपाय म्हणजे, सकाळी चहा पिण्यापूर्वी किमान दोन ग्लास साधे पाणी प्यावे, ज्यामुळे चहाचा दाहकपणा बऱ्याच अंशी कमी होतो.
पाणी प्यायल्यामुळे चहा पोटात जास्त गरम लागत नाही आणि सौम्य (Dilute) झाल्यामुळे त्याचे दुष्परिणाम जवळजवळ नगण्य होतात.
चहापेक्षा त्यासोबत खाल्ले जाणारे अनहेल्दी स्नॅक्स (तळलेले नमकीन, मैद्याचे बिस्किट्स, खारी) शरीराला जास्त नुकसान पोहोचवतात.
चहासोबत मैद्याचे किंवा तळलेले पदार्थ खाण्याऐवजी भाजलेले चणे, मखाने, मुरमुरे, पोहे किंवा पराठा यांसारखे पौष्टिक पदार्थ खावेत.