Kitchen Knife: किचनमधील चाकूमुळे पसरत आहेत आजार... FSSAI चा इशारा, त्वरित करा हे काम

Anirudha Sankpal

भारताचे अन्न नियामक 'FSSAI' ने सर्व रेस्टॉरंट मालक आणि खाद्य व्यावसायिकांना अन्न बनवताना व पॅकेजिंग करताना पूर्णपणे स्वच्छ चाकू आणि ब्लेड वापरण्याचे कडक आदेश दिले आहेत.

बाजारात अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून गंजलेले, तुटलेले किंवा रंग उडालेले चाकू वापरले जात असून, हे थेट लोकांच्या आरोग्याशी खेळण्यासारखे आहे.

फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स रेग्युलेशन २०११ नुसार, अन्नाच्या संपर्कात येणारी सर्व भांडी आणि उपकरणे 'फूड-ग्रेड' आणि गैर-विषारी (नॉन-टॉक्सिक) मटेरियलची असणे बंधनकारक आहे.

FSSAI च्या नवीन नियमांनुसार, स्वयंपाकघरातील सर्व खराब झालेले, चरे पडलेले किंवा गंजलेले ब्लेड्स तातडीने बदलून त्याजागी नवीन उपकरणे वापरावी लागणार आहेत.

नियमांचे पालन न करणाऱ्या फूड आउटलेट्स आणि रेस्टॉरंट्सवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्राधिकरणाने दिला आहे.

FSSAI ने सर्व राज्यांच्या अन्न सुरक्षा आयुक्तांना आणि निरीक्षकांना रेस्टॉरंट्स आणि कॅफेंवर कडक पाळत ठेवण्याचे व दोषींवर थेट कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

संशोधनानुसार, गंजलेल्या आणि अस्वच्छ चाकूंच्या वापरामुळे खाद्यपदार्थांमध्ये हानिकारक बॅक्टेरिया आणि मायक्रोबायोलॉजिकल प्रदूषण वाढण्याचा धोका असतो.

धातूवर गंज चढल्यास त्याची पृष्ठभाग खडबडीत होते, जिथे 'साल्मोनेला' आणि 'ई-कोलाय' सारखे धोकादायक जीवाणू सहज वाढतात आणि ते साध्या धुण्याने स्वच्छ होत नाहीत.

गंजलेल्या चाकूने कापलेले अन्न खाल्ल्यामुळे लोकांना 'फूड पॉयझनिंग' (अन्नबाधा) आणि इतर गंभीर आजार होण्याचा मोठा धोका निर्माण होतो.

येथे क्लिक करा