पुढारी वृत्तसेवा
चुकीच्या पद्धतीचे काजळ वापरल्यास डोळ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.
जे लोक कॉन्टॅक्ट लेन्स वापरतात, त्यांनी कधीही काजळ घालू नये
काजळाचे बारीक कण लेन्सला चिटकल्यास लेन्स खराब होऊ शकते
वारंवार डोळे येण्याचा त्रास, डोळे कोरडे पडण्याची समस्या आहे, त्यांनी काजळ वापरणे टाळावे
जर काजळाची डबी/काडी एकापेक्षा जास्त जण वापरत असतील, तर तीव्र खाज सुटू शकते.
बाजारात मिळणाऱ्या रासायनिक काजळांमध्ये पारा/इतर घातक घटक असतात
यामुळे डोळे लाल होणे, पाणी येणे, प्रचंड जळजळ असा त्रास होतो.
जुन्या पद्धतीच्या काजळामध्ये 'लेड' (शिसे) किंवा जड धातूंचे प्रमाण जास्त असते
हे घटक डोळ्यांच्या नसांसाठी अतिशय घातक ठरू शकतात.