AC Side Effect: तासंतास AC मध्ये बसणं धोक्याचं... त्वचारोग पासून थर्मल शॉकपर्यंत होऊ शकतात 'या' समस्या

Anirudha Sankpal

श्वसनाच्या समस्या

तासनतास एसीमध्ये बसल्यामुळे घसा खवखवणे, कोरडा खोकला आणि नाकातील ओलावा कमी होऊन जळजळ होण्याचा त्रास होऊ शकतो.

त्वचा आणि डोळ्यांवर परिणाम

एसीमधील हवा कोरडी असल्याने त्वचा निस्तेज होते आणि डोळ्यांना खाज किंवा 'ड्राय आय'ची समस्या निर्माण होते.

थर्मल शॉकचा धोका

बाहेरच्या कडक उन्हातून थेट एसीच्या गारव्यात आल्याने शरीराचे तापमान अचानक बदलते, ज्याला 'थर्मल शॉक' म्हणतात.

स्नायूंचे आखडणे

अतिथंड हवेमुळे सांधेदुखी, स्नायू आखडणे आणि काही व्यक्तींमध्ये तीव्र डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास वाढू शकतो.

संसर्गाचा धोका

जर एसीचे फिल्टर वेळोवेळी स्वच्छ केले नाहीत, तर त्यात धुलीकण आणि बॅक्टेरिया वाढून श्वसनसंस्थेचे गंभीर आजार होऊ शकतात.

तापमानावर नियंत्रण

आरोग्यासाठी एसीचे तापमान नेहमी २४ ते २६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान ठेवणे फायदेशीर ठरते.

पाण्याचे प्रमाण

एसीमध्ये राहिल्याने तहान कमी लागते, परंतु डिहायड्रेशन टाळण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.

Drinking Water | Pudhari

सावधगिरी

शरीरावर एसीची हवा थेट घेण्याऐवजी ती खेळती ठेवा आणि फिल्टर नियमितपणे स्वच्छ करा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

येथे क्लिक करा