पुढारी वृत्तसेवा
श्रावणात महिनाभर दारू/मद्य पूर्णपणे बंद केल्यास शरीरात अनेक महत्त्वपूर्ण बदल घडतात.
वैद्यकीय भाषेत याला 'डिटॉक्सिफायिंग फेज' (Detoxifying Phase) म्हणतात.
अल्कोहोल पचवताना लिव्हरवर प्रचंड ताण येतो, ज्यामुळे लिव्हरमध्ये चरबी (Fatty Liver) साचते.
३० दिवस दारू बंद केल्याने लिव्हरच्या पेशींचे पुनरुज्जीवन (Cell Regeneration) सुरू होते.
लिव्हरमधील सूज कमी होते आणि फॅटी लिव्हरचा धोका १५% ते २०% ने कमी होतो.
दारूमुळे मेंदूतील चेतातंतू (Neurotransmitters) विस्कळीत होतात, ज्यामुळे झोप वरवरची लागते आणि रात्री वारंवार जाग येते.
दारू बंद झाल्यानंतर ३-४ दिवसांत मेंदूचे कार्य पूर्ववत होते. रात्री गाढ आणि शांत झोप (REM Sleep) लागते
ज्यामुळे सकाळी उठल्यावर थकवा, चिडचिड आणि ॲंगझायटी (उदासीनता) जाणवत नाही.
अल्कोहोलमुळे रक्तातील पांढऱ्या पेशींची (White Blood Cells) संसर्गाशी लढण्याची क्षमता मंदावते.
रोगप्रतिकारक शक्ती वेगाने सुधारते, ज्यामुळे पावसाळ्यातील व्हायरल इन्फेक्शन, सर्दी, पोटाच्या आजारांपासून संरक्षण होते.
दारूमध्ये 'एम्प्टी कॅलरीज' (पोषकतत्वे नसलेल्या कॅलरीज) जास्त असतात
शिवाय दारूसोबत खाल्ले जाणारे चकणा/तळलेले पदार्थ वजन वाढवतात.
अल्कोहोल बंद केल्याने पचन सुधारते. ॲसिडिटी व पोट फुगणे बंद होते
एका महिन्यात २ ते ३ किलो वजन नैसर्गिकरीत्या कमी होऊ शकते.
अल्कोहोल हे 'डाय्युरेटिक' (Diuretic) आहे, म्हणजेच ते शरीरातील पाणी बाहेर फेकून डिहायड्रेशन निर्माण करते
मद्य थांबवल्यामुळे १ महिन्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण (Hydration) पूर्ववत होते
रक्ताभिसरण सुधारल्याने त्वचेवरील सुजलेलेपणा कमी होतो आणि चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो.