पुढारी वृत्तसेवा
मधाच्या पोळ्यापासून मिळालेल्या मेणाला इंग्लिशमध्ये 'बीजवॅक्स' (Beeswax) म्हणतात.
हे मेण नैसर्गिक असल्यामुळे विविध क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर वापरले जाते:
बॉडी लोशन, मॉईश्चरायझर, लिप बाम, लिपस्टिक क्रीम्समध्ये याचा वापर होतो
बीजवॅक्सच्या मेणबत्त्या कमी धूर देतात, जास्त वेळ जळतात, हवेतील अशुद्धता कमी करतात
लाकडी फर्निचर, शूज, चामड्याच्या वस्तू चकचकीत व सुरक्षित ठेवण्यासाठी याचा वापर होतो.
कपडे किंवा शूजवर पाणी रोखण्यासाठी वॉटरप्रूफिंगसाठी मेण लावले जाते.
त्वचेवरील जखमा, जळजळ, कोरडेपणा कमी करणाऱ्या मलममध्ये बेस म्हणून वापर होतो.
काही गोळ्यांवर (Pills) कोटिंग करण्यासाठी याचा उपयोग केला जातो.
सफरचंद किंवा इतर फळांचा ताजेपणा टिकवण्यासाठी त्यावर बीझवॅक्सचा पातळ थर दिला जातो.
चीझ खराब होऊ नये म्हणून त्यावर मेणाचा थर दिला जातो.
शिलाई करताना धागा मजबूत व्हावा आणि अडकू नये म्हणून त्याला मेण लावले जाते.
मेणाचे पुतळे, बॅटिक प्रिंटिंग, विविध वस्तू बनवण्यासाठी वापर होतो.