उन्हाळ्यात चिक्कू खावा का? खाल्ल तर काय होतं?

Rahul Shelke

उन्हाळ्यात चिक्कू खावा का?

उन्हाळ्यात बाजारात भरपूर प्रमाणात मिळणारा गोड, रसाळ चिक्कू खरोखर आरोग्यासाठी चांगला आहे का? चला जाणून घेऊया!

Chikoo in Summer Benefits | Pudhari

शरीराला त्वरित ऊर्जा

चिक्कूमध्ये नैसर्गिक साखर आणि फ्रुक्टोज असते. उन्हाळ्यात थकवा आल्यास चिक्कू त्वरित ऊर्जा देतो.

शरीराला थंडावा देतो

उन्हामुळे शरीरात वाढणारी उष्णता कमी करण्यास चिक्कू मदत करतो. गरमीच्या दिवसांत हलकं आणि ताजेतवाने वाटण्यासाठी उपयुक्त.

Chikoo in Summer Benefits | Pudhari

पचनासाठी फायदेशीर

चिक्कूमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. यामुळे बद्धकोष्ठता कमी होते आणि पचनसंस्था सुरळीत राहते.

Chikoo in Summer Benefits | Pudhari

त्वचेसाठी वरदान

चिक्कूमध्ये जीवनसत्त्वे A, C आणि E असतात. ही जीवनसत्त्वे त्वचा हायड्रेट ठेवतात आणि नैसर्गिक चमक देतात.

Chikoo in Summer Benefits | Pudhari

रक्तदाब नियंत्रणात मदत

पोटॅशियममुळे शरीरातील मीठाचे संतुलन राखले जाते. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.

Chikoo in Summer Benefits | Pudhari

पण जास्त खाल्ल्यास?

चिक्कूमध्ये साखर जास्त असते. अतिसेवन केल्यास वजन वाढण्याची शक्यता असते.

Chikoo in Summer Benefits | Pudhari

मधुमेहींनी घ्यावी काळजी

मधुमेह असलेल्या व्यक्तींनी चिक्कू मर्यादित प्रमाणात खावा. डॉक्टरांचा सल्ला घेऊनच सेवन करणे योग्य.

Chikoo in Summer Benefits | Pudhari

पोट फुगणे, गॅस?

जास्त फायबरमुळे काहींना पोट फुगणे किंवा गॅसचा त्रास होऊ शकतो. म्हणून मर्यादित प्रमाण महत्त्वाचे.

Chikoo in Summer Benefits | Pudhari

डॉक्टरांचा सल्ला

कोणतीही नवीन गोष्ट आहारात घेताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Chikoo in Summer Benefits | Pudhari

ताक आणि मठ्ठा यांच्यात काय फरक आहे? तुम्हाला माहितेय का?

Tak vs Mattha | Pudhari
येथे क्लिक करा