स्वालिया न. शिकलगार
शिवानी रांगोळेने ‘कोहम्म’ या नाटकातील तिचा अनुभव सांगितलाय
हे नाटक ओळख, आत्मशोध, आयुष्यातील प्रश्नांवर आधारित असून युवा पिढीसोबत जोडले गेल्याचं ती म्हणते
ज्ञानोबा-तुकोबांच्या साहित्यात स्व-शोधाचा प्रश्न आणि उत्तर मिळवण्याच्या प्रक्रियेचा वेध म्हणजे 'कोऽहम्' होय
'कोऽहम्'चा अर्थ मी कोण? असा होतो. म्हणजेच आत्मशोध, स्वतःची ओळख, नाती आणि अस्तित्व.
हे नाट्यमय सादरीकरण मृणाल कुलकर्णी आणि शिवानी करतात
शिवानी म्हणते, ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकरांच्या साहित्यावर आधारित हा नाट्यानुभव आहे
या साहित्यातील संत परंपरेवरील काही परिच्छेद यात आहेत
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, छ. शिवाजी महाराज..एका वेगळ्या संवादातून भेटतात