स्वालिया न. शिकलगार
'कल्याणची चुलबुली' शिवाली परब आणि रसिका वेंगुर्लेकरचे परदेश टूरचे फोटो व्हायरल झाले आहेत
रसिका आणि शिवाली दोघीही 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून घराघरात पोहोचल्या
रसिका खास करून तिच्या कोकणी भाषेतील टोनसाठी ओळखली जाते
तर आपल्या सहज अभिनयासाठी शिवाली परब सर्वश्रुत आहे
ऑस्ट्रेलियाच्या सफरीबाबत शिवालीने इन्स्टावरून अपडेट दिलीय
शिवालीने ऑस्ट्रेलियातून वेस्टर्न लूकमधील फोटो शेअर केलेत
द नोबीज आयलँडमध्ये निळाशार समुद्रकिनारी तिने व्हिडिओ शेअर केलेत
तर रसिका वेंगुर्लेकर हिने सिडनीतून फोटोज अपलोड केलेत
शिवालीच्या व्हिडिओमध्ये विनोदवीर पृथ्वीक प्रतापदेखील दिसतो
त्यामुळे रसिका-शिवाली-पृथ्वीक ऑस्ट्रेलियाच्या भटकंतीवर असून निसर्गाचा आनंद घेताना दिसताहेत