Shivaji Maharaja: शिवरायांचे सर्वात विश्वासू आठ मंत्री कोण होते?

पुढारी वृत्तसेवा

अष्टप्रधान मंडळ

राज्य जिंकणं पुरेसं नसतं… ते टिकवणं, वाढवणं आणि प्रजेला सुखी ठेवणं अधिक महत्त्वाचं असतं. म्हणूनच शिवरायांनी उभारलं एक मजबूत आणि विश्वासू अष्टप्रधान मंडळ.

Ashtapradhan Mandal | Pudhari

मोरो त्रिंबक पिंगळे – प्रधान (पेशवा)

मोरो त्रिंबक पिंगळे हे शिवरायांचे प्रधान होते. संपूर्ण राज्यकारभाराची सूत्रे त्यांच्या हातात होती. महाराजांचे ते मुख्य सल्लागार होते.

Ashtapradhan Mandal | Pudhari

रामचंद्र नीळकंठ मुजुमदार – अमात्य

रामचंद्र नीळकंठ मुजुमदार अमात्य म्हणून राज्याचा जमाखर्च पाहत. स्वराज्याचा खजिना, महसूल, उत्पन्न आणि खर्च यावर त्यांचे बारकाईने लक्ष असे.

Ashtapradhan Mandal | Pudhari

हंबीरराव मोहिते – सेनापती

हंबीरराव मोहिते हे स्वराज्याचे सेनापती होते. सैन्याचे नेतृत्व करणे, रणांगणात पराक्रम गाजवणे आणि सैनिकांमध्ये शिस्त राखणे ही त्यांची जबाबदारी होती.

Ashtapradhan Mandal | Pudhari

मोरेश्वर पंडितराव – पंडितराव

मोरेश्वर पंडितराव धार्मिक कार्यांची जबाबदारी सांभाळत. धर्मादाय कामे, दानधर्म आणि धार्मिक विषयांवरील मार्गदर्शन ते करत.

Ashtapradhan Mandal | Pudhari

निराजी रावजी – न्यायाधीश

निराजी रावजी न्यायाधीश म्हणून कार्य करत. प्रजेचे वाद-विवाद सोडवून न्यायदान करणे ही त्यांची मुख्य जबाबदारी होती.

Ashtapradhan Mandal | Pudhari

अण्णाजी दत्तो – सचिव

अण्णाजी दत्तो सचिव म्हणून सरकारी आज्ञापत्रे तयार करत आणि महत्त्वाची कागदपत्रे सांभाळत.

Ashtapradhan Mandal | Pudhari

दत्ताजी त्रिंबक वाकनीस – मंत्री

दत्ताजी त्रिंबक वाकनीस मंत्री म्हणून राज्यातील पत्रव्यवहार आणि नोंदी सांभाळत. राज्यातील घडामोडींची माहिती ठेवणे आणि योग्य ती नोंद करणे ही त्यांची जबाबदारी होती.

Ashtapradhan Mandal | Pudhari

रामचंद्र त्रिंबक डबीर – सुमंत

रामचंद्र त्रिंबक डबीर सुमंत म्हणून परराज्यांशी संबंध ठेवत. तह, चर्चा आणि राजनैतिक व्यवहार ते सांभाळत.

Ashtapradhan Mandal | Pudhari

खास वैशिष्ट्य

शिवरायांनी या मंत्र्यांना इनाम किंवा जहागिरी दिली नाही; त्याऐवजी भरघोस रोख पगार दिला. या सुजाण अष्टप्रधानांमुळेच हिंदवी स्वराज्य अधिक बळकट झालं.

Ashtapradhan Mandal | Pudhari