पुढारी वृत्तसेवा
बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंडाची शिक्षा दिल्या नंतर आता त्यांच्या खाजगी संपत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
हसीना यांच्या निवासस्थानी काम करणारा जहांगिर आलम तब्बल 284 कोटी रुपयांचा मालक असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. सध्या तो अमेरिकेत राहत आहे.
इतक्या प्रचंड रकमेमुळे निर्माण झालेल्या संशयानंतर या प्रकरणाची चौकशी होणार आहे.
2024 च्या निवडणूक शपथपत्रानुसार, हसीना यांच्या नावावर फक्त 3.14 कोटींची मालमत्ता आहे. त्यात शेती, सहा एकर जमीन, फिश फार्मिंग आणि भेट मिळालेली एक कार आहे.
पंतप्रधानपदावर असताना हसीनांचा वार्षिक पगार 9.93 लाख रुपये होता. मग त्यांच्या नोकराकडे शेकडो कोटी कसे आले?
5 ऑगस्ट 2024 च्या विद्यार्थी आंदोलनानंतर हसीना भारतात आल्या. सत्तांतर, मृत्युदंड आणि आता संपत्तीविषयीचे प्रश्न यामुळे देशात तणाव वाढला आहे.
हसीना यांच्या घोषित संपत्तीत आणि नोकराच्या मालमत्तेत प्रचंड अंतर दिसत असल्याने भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार यावर देशभर चर्चा सुरू आहे.
ही संपत्ती कुठून आली? कोणाच्या माध्यमातून जमा झाली? हसीनांच्या कार्यकाळाशी काही संबंध आहे का? हे सर्व तपासाचे प्रमुख मुद्दे आहेत.