Biggest Shoe Size Athlete |‘या’ खेळाडूच्या शूजची साईझ आहे चक्क 22 नंबरची

Namdev Gharal

सर्वसाधारण माणसांच्या शूजची साईज असते 6 ते 15 च्या दरम्यान पण एका माजी अमेरिकन बास्केटबॉल प्लेअरच्या शूजची साइज आहे 22 नंबर्स

या खेळाडूचे नाव आहे Shaquille O'Neal पण तो शॅक या नावानेच प्रसिद्ध आहे. या जायंट आकाराच्या खेळाडूची सर्वच गोष्टी अवाढव्य आकाराच्या आहेत

NBA मधील सुपरस्टार असलेल्या Shaq ची उंची आहे ७ फूट १ इंच आणि वजन 147 किलो त्‍यामुळे एवढ्या उंचीच्या माणसाचे जिवनही अशाच अवाढव्य गोष्टीने भरलेले आहे. 1992 पासून 2011 पर्यंत तो खेळत होता.

सामान्य बेडवर शॅक यांना झोपणे अशक्य असल्याने त्यांनी स्वतःसाठी खास बेड बनवून घेतला आहे. आकार: त्यांचा बेड ३० फूट लांब आणि १५ फूट रुंद आहे.

एका ७ फूट १ इंच माणसाला ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी भरपूर अन्नाची गरज असते: नाश्ता: ते सकाळी साधारणपणे १० ते १२ अंड्यांचा ऑम्लेट खातात तसेच फ्राईड चिकनही प्रचंड आवडते.

त्यांच्या प्रचंड वजनामुळे सामान्य टॉयलेट सीट्स तुटण्याची भीती असते, म्हणून त्यांनी खास मजबूत आणि मोठ्या आकाराच्या टॉयलेट सीट्स बसवल्या आहेत.

सामान्य शावरची उंची त्यांच्या खांद्यापर्यंतच येते, त्यामुळे त्यांच्या घरातील शावर हे छताच्या अगदी जवळ (अंदाजे ८-९ फूट उंचीवर) बसवण्यात आले आहेत.

त्यांना कार्सची खूप आवड आहे, पण त्यांच्या उंचीमुळे त्यांना साध्या कारमध्ये बसता येत नाही. म्हणून ते कारचे छत काढून त्या 'कस्टमाइज' करून घेतात.

सवय: विशेष म्हणजे, शॅक यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात कधीही कॉफी प्यायलेली नाही. बास्केटबॉल खेळताना ते ऊर्जा मिळवण्यासाठी पेस्ट्री आणि सोडा पिणे पसंत करायचे.

सामान्य माणसाच्यास हातात पाण्याची बाटली ही त्‍याच्या पूर्ण पंजामध्ये मावते पण शॅक यांच्या केवळ बोटांमध्ये 1 लिटर पाण्याची बाटली बसते.

Vaseline History | तुम्हाला माहिती आहे का? व्हॅसलिनचा शोध एका टाकाऊ पदार्थापासून लागला