Lohagad Fort | लोहगड - अंगावर काटा येईल अशा दऱ्या, उरात धडकी भरवणारा वारा!

Namdev Gharal

डोंगर दऱ्यांमधून वाहणारा उरात धडकी भरवणारा वारा आणि आजही दिमाखात उभा असलेला अभेद्य असा महाराष्ट्रातील एक किल्ला म्हणजे लोहगड

२००० हजार वर्षापूर्वीचा इतिहास : हा किल्ला सातवाहन काळात याचा पाया खोदण्यात आला त्‍यानंतर सातवाहन, बहमनी, निजामशाही आणि त्यानंतर शिवकाळात या किल्ल्याचे बांधकाम होत गेले.

१६४८ ते १६७० चा काळ: छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा हा किल्ला स्वराज्यात आणला, तेव्हा त्याची डागडुजी करून घेता तटबंदी अधिक मजबूत केली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी १६४८ मध्ये हा किल्ला जिंकला. सुरतेची लूट आणून सुरक्षित ठेवण्यासाठी या किल्ल्याचा मुख्य तिजोरीसारखा वापर केला गेला होता.

लोहगडाचे मुख्य आकर्षण म्हणजे त्याचे मजबूत दरवाजे. गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा आणि महादरवाजा आजही भक्कम स्थितीत उभे आहेत.

किल्ल्याचा पश्चिमेकडील भाग विंचवाच्या नांगीसारखा अरुंद दिसतो, म्हणून याला 'विंचू कडा' म्हणतात. इथे चालताना अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही!

याचे बरुज, दरवाजे, व वरुन दिसणाऱ्या दऱ्या खोऱ्या अतिशय रौर्द रुप दाखवतो. याचे सौंदर्य पावसाळ्यात अधिक खुलून दिसते.

लोणावळ्याजवळ असलेला हा किल्ला ट्रेकिंगसाठी अतिशय सोपा आणि तितकाच नयनरम्य आहे. पावसाळ्यात येथील सौंदर्य कैक पटीने वाढते.

पावसाळ्यात दऱ्यांमधुन वाहणारे वारे डोंगरावरुन पडणारया पाण्याला परत मागे फेकते हे दृश्य वारयाचा प्रचंड वेग दाखवतो

पुणे किंवा मुंबईहून लोकल ट्रेनने 'मळवली' स्टेशन गाठा. तिथून पुढे भाजीगाव मार्गे तुम्ही चालत किंवा वाहनाने किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचू शकता.

लोहगडाला भेट देण्यासाठी पावसाळा आणि हिवाळा हा सर्वोत्तम काळ आहे. मात्र, विंचू कड्यावर जाताना वारा अतिशय वेगाने वाहतो

सांदण व्हॅली