Earth Core: पृथ्वीचा असा भाग ज्याचं तापमान असतं सूर्याच्या पृष्ठभागाएवढं!

Anirudha Sankpal

पृथ्वीचा गाभा हा सर्वात महत्त्वाचा आणि रहस्यमय भाग आहे.

बाह्य गाभा (Outer Core) हा थर द्रव (Liquid) अवस्थेत आहे आणि प्रामुख्याने वितळलेल्या लोह (Iron) आणि निकेल (Nickel) चा बनलेला आहे.

या द्रवरूप धातूंच्या सततच्या प्रवाहामुळे (Convection) पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र (Earth's Magnetic Field) तयार होते.

हे चुंबकीय क्षेत्र पृथ्वीचे सौर वाऱ्यांपासून (Solar Winds) संरक्षण करते, ज्यामुळे पृथ्वीवर जीवसृष्टी शक्य झाली.

अंतर्गाभा (Inner Core) हा गाभ्याचा सर्वात आतील भाग घन (Solid) अवस्थेत आहे.

इथे दाब (Pressure) इतका प्रचंड असतो की, तापमान सूर्याच्या पृष्ठभागाएवढे (सुमारे 5,000 डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त) असूनही धातू द्रव न राहता घन राहतो.

हा अंतर्गाभा देखील लोह आणि निकेल यांचा बनलेला आहे.

काही नवीन संशोधनात असे संकेत मिळालेत की या घन अंतर्गाभ्यामध्ये देखील 'अंतर्-अंतर्गाभा' (Innermost Inner Core) हा एक वेगळा थर असू शकतो.

येथे क्लिक करा