पुढारी वृत्तसेवा
ख्रिसमस आला की सगळ्यात जास्त उत्सुकता असते ती सीक्रेट सांताची. नाव गुप्त ठेवून भेटवस्तू देणं, ही परंपरा ख्रिसमसमध्ये आहे.
सीक्रेट सांता फक्त धार्मिक सणापुरतं मर्यादित नाही. ऑफिस, मित्रपरिवार, कुटुंब – सगळीकडे हा खेळ आनंद खेळला जातो.
आजकाल सोशल मीडियावर सीक्रेट सांताचे फोटो, व्हिडिओ भरपूर दिसतात. “कोण असेल माझा सांता?” ही उत्सुकता सगळ्यांना असते.
सीक्रेट सांताची मुळे युरोपातील ख्रिसमस परंपरांमध्ये आहेत. विशेषतः स्कँडिनेव्हिया आणि जर्मनीत ही संकल्पना जन्माला आली.
चौथ्या शतकातील सेंट निकोलस हे गुपचूप भेटवस्तू देण्यासाठी प्रसिद्ध होते. गरजू लोकांना ते नाव न सांगता मदत करायचे.
स्कँडिनेव्हियामध्ये ‘जुलक्लॅप’ नावाची परंपरा होती. शेजाऱ्याच्या दारात गिफ्ट ठेवून लगेच पळून जाणं अशी ही परंपरा होती.
1979 पासून अमेरिकेतील लॅरी डीन स्टीवर्ट गरजू लोकांना गुपचूप 100 डॉलर्स देत होते – कोणताही गाजावाजा नाही.
लॅरी यांच्या कृतींनी अनेकांना प्रेरणा दिली. शाळा, ऑफिस, सामाजिक कार्यक्रमांत सीक्रेट सांता वाढत गेला.