अविनाश सुतार
हॉटेल्सची रचना ग्राहकांना रोजच्या दिनक्रमातून बाहेर काढण्यासाठी केली जाते, त्यांना रोजच्या व्यस्त वेळापत्रकातून अधिक निवांत मिळावा, यासाठी वेळीची जाणीव करून दिली जात नाही
घरी, ऑफिसमध्ये अलार्म, मीटिंग्स, डेडलाईन्स असतात, त्यामुळे हॉटेलमध्ये वेळेची सतत आठवण करून देणाऱ्या गोष्टी काढून टाकल्यामुळे ग्राहक रोजच्या धबडग्यातून मुक्त होऊ शकतो
सतत वेळ पाहिल्याने ताण आणि चिंता वाढते, असा अभ्यास मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या निरीक्षणातून समोर आले आहे, त्यामुळे घड्याळापासून काहीवेळ दूर राहिल्यास निवांतपण मिळतो
लक्झरी हॉटेल्समध्ये मानसिक गोंधळ कमी करण्यासाठी सौम्य प्रकाश, शांत रंगसंगती, कमी आवाजाची रचना केलेली असते, टिक-टिक करणारे घड्याळ या वातावरणाला बाधा आणू शकते
बहुतांश प्रवासी वेळ पाहण्यासाठी मोबाईल फोन, स्मार्टवॉच किंवा लॅपटॉपवर अवलंबून असतात. त्यामुळे हॉटेल्सच्या खोलीत घड्याळे लावणे अनावश्यक ठरू लागले आहे
पूर्वी हॉटेलमधील घड्याळे चुकीची वेळ, विचित्र वेळी वाजणारे अलार्म, सेट करायला अवघड, सततच टिक-टिक आवाज करणारी होती. त्यामुळे प्रवाशींच्या झोपेत अडथळा येत होता
प्रवाशी घड्याळाकडे पाहत नाहीत, ते निवांत थांबतात. नाश्ता निवांतपणे करतात, लॉबीमध्ये वेळ घालवतात, असे निरीक्षण आदरातिथ्य क्षेत्रातील अभ्यासातून समोर आले आहे
झोपेवरील अभ्यासातून असे दिसून आले आहे की, झोप येण्याचा प्रयत्न करताना वारंवार घड्याळाकडे पाहिल्याने अनिद्रा वाढू शकते. वेळ सरकत असल्याने रात्री २ ते ३ या वेळेत अधिक चिंता वाढते
आजच्या काळात लोकांना स्वतंत्र घड्याळांची गरजच उरलेली नाही. स्मार्टफोनने अलार्म घड्याळ, हातघड्याळ, कॅलेंडर सगळ्यांची जागा घेतली आहे. त्यामुळे खोलीत ठेवलेली घड्याळे अनावश्यक ठरू लागली