पुढारी वृत्तसेवा
उन्हाळ्याचा तडाखा वाढलाय? वाढत्या उष्णतेमुळे शरीराची लाहीलाही होत असेल, तर नुसतं पाणी पिण्यापेक्षा ताक पिणं कधीही उत्तम!
ताक आहे अमृतासारखं
ताक केवळ तहान भागवत नाही, तर शरीराला आतून थंडावा देण्यासही मदत करते.
नुसतं ताक पिण्यापेक्षा...
जर तुम्ही ताकात एक विशेष मसाला मिक्स केला, तर त्याचे फायदे आणि चव दोन्ही दुप्पट होतात.
हा आहे तो 'खास मसाला'
ताकात जिरे पूड, काळं मीठ आणि थोडा चाट मसाला एकत्र करून पहा, यामुळे पचनशक्ती सुधारते.
उष्णता होईल क्षणात गायब
जिऱ्यामध्ये नैसर्गिक थंडावा असतो, जो शरीरातील उष्णता शोषून घेण्यास मदत करतो.
पोटाच्या समस्यांवर गुणकारी
जर तुम्हाला पित्त किंवा गॅसचा त्रास असेल, तर हा मसाला घातलेलं ताक पिणं रामबाण उपाय ठरेल.
पुदिना आणि कोथिंबीर
अधिक फ्रेश वाटण्यासाठी ताकात थोडा पुदिना आणि बारीक चिरलेली कोथिंबीर नक्की टाका.
आजच ट्राय करा!
बाजारातील थंड पेयांपेक्षा हे 'मसाला ताक' आरोग्यासाठी नक्कीच सर्वोत्तम आणि स्वस्त पर्याय आहे.