पुढारी वृत्तसेवा
पालकांमध्ये संभ्रम: मुलं आजारी पडली की 'केळी खायला द्यावी का?' हा प्रश्न अनेक पालकांना पडतो.
पौष्टिकतेचा खजिना: केळ्यामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि बी६ भरपूर असते, जे शरीराला ऊर्जा देते.
केळ्यामुळे सर्दी वाढते का? आयुर्वेद सांगते की केळं 'कफ' वाढवू शकतं, पण ते प्रकृतीवर अवलंबून असतं.
खोकला असल्यास काय करावे? जर मुलाला तीव्र खोकला किंवा छातीत कफ असेल, तर रात्रीच्या वेळी केळं देणं टाळावं.
पचनासाठी उत्तम: उलट्या किंवा जुलाब झाले असल्यास केळं हे मुलांसाठी सर्वात सुरक्षित आणि हलकं अन्न मानलं जातं.
कधी द्यावे? मुलाला सर्दी असल्यास केळं दिवसा (दुपारी) द्यावे, फ्रिजमधील थंड केळे कधीही देऊ नका.
प्रतिकारशक्ती वाढते: केळ्यातील अँटी-ऑक्सिडंट्स आजारपणातून लवकर सावरण्यासाठी मदत करतात.
तज्ज्ञांचा सल्ला: मुलाला जास्त त्रास असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आहार ठरवणे केव्हाही उत्तम