Second hand mobile tips: सेकंड-हँड मोबाईल खरेदी करताय? ‘ही चेकलिस्ट’ जरूर वाचा

मोनिका क्षीरसागर

सेकंड-हँड फोन खरेदी करण्यापूर्वी फोनची बॉडी नीट तपासा, स्क्रॅचेस किंवा डॅमेज नाही ना हे पाहा.

IMEI नंबर तपासणे विसरू नका, तो बिल व बॉक्सवरील नंबरशी जुळतोय का ते पाहा.

फोन चोरीचा नाही ना याची खात्री करण्यासाठी IMEI ट्रॅकरवर तपासणी करा.

बॅटरी हेल्थ तपासा, कारण जुना फोन घेतल्यावर सर्वात जास्त समस्या बॅटरीमुळे येते.

कॅमेरा, स्पीकर, चार्जिंग पोर्ट, हेडफोन जॅक नीट काम करतात का हे ट्राय करून पाहा.

सॉफ्टवेअर अपडेट येतंय का हे बघा; खूप जुने मॉडेल घेतल्यास अपडेट्स मिळणार नाहीत.

फॅक्टरी रिसेट केलेला फोनच घ्या, म्हणजे त्यात जुन्या मालकाचा डेटा शिल्लक राहणार नाही.

खरेदी करताना बिल, बॉक्स आणि अॅक्सेसरीज उपलब्ध आहेत का याची खात्री करा.

शक्यतो विश्वासार्ह सेलर किंवा अधिकृत स्टोअरमधूनच सेकंड-हँड फोन खरेदी करा.

येथे क्लिक करा...