कॉल रिसिव्ह करताना फोनचा इंटरफेस म्हणजेच डिस्प्ले आणि डिझाइन बदललेला आहे
हे बदल फक्त अँड्रॉइड फोनमध्येच झाले आहेत. आयओएस फोनमध्ये बदल झालेला नसल्याने त्यांना काळजी करण्याचं कारण नाही
अँड्रॉइड फोनमध्ये हे बदल नक्की कशामुळे झाले, या सेटिंग्स नेमक्या कशा बदलल्या, त्या पुन्हा पूर्वीसारख्या करता येणार का?
फोन कॉलच्या सेटिंग्स 'हॅकिंग' की अपडेट - खरे कारण काय?
मोबाइल कंपन्या वेळोवेळी फोन अपडेट करत असतात, जेणेकरून तो आधीच्या तुलनेत अधिक चांगला आणि सुरक्षित होईल
सर्व अँड्रॉइड फोनचं सॉफ्टवेअर गुगलकडून तयार केलं जातं आणि गुगलकडूनच अपडेटही केलं जातं
गुगल कंपनीने 'मे 2025' मध्ये घोषणा केली होती की, ते 'मटेरिअल 3 डी एक्स्प्रेसिव्ह' नावाचे अपडेट आणत आहे
या अपडेटद्वारे फोनमधील सॉफ्टवेअर आणि डिस्प्लेचा वापर अधिक सोपा, जलद आणि अधिक माहितीपूर्ण होतोय
परंतु युझर्सच्या परवानगीशिवाय या सेटिंग्स कशा बदलल्या?
गुगलने 'रिसेन्ट' आणि 'फेव्हरेट्स' हे पर्याय काढून टाकले असून त्यांना 'होम'मध्ये मर्ज केलं आहे. त्यामुळे आता तुम्ही फोन अॅप उघडल्यावर तुम्हाला फक्त 'होम' आणि 'कीपॅड' हे पर्याय दिसणार आहेत
आता एकाच नंबरवरून आलेले सर्व कॉल्स एकत्रितपणे किंवा एकाच ठिकाणी दाखवले जाणार नाहीत, तर कॉल हिस्ट्रीमध्ये वेळेनुसार दाखवले जातील. त्यामुळे तुम्हाला वारंवार कॉन्टॅक्ट शोधायची गरज पडणार नाही.
प्रत्येकवेळी नंबर वेगळपणाने उघडून किती मिस्ड कॉल्स आहेत, किती रिसिव्ह झाले हे पाहण्याची आता गरज पडणार नाही
गुगल प्ले स्टोअरमध्ये (जिथून अॅप्स इन्स्टॉल किंवा अपडेट केल्या जातात) काही वापरकर्त्यांच्या फोनवर ऑटो-अपडेट्स ऑन असतात, त्यामुळे काही अॅप्स आपोआप अपडेट होतात
युझर ऑटो-अपडेट्स ऑफ करू शकतात आणि फोन कॉलच्या डिस्प्ले सेटिंग्ज पुन्हा पूर्वीसारख्या करण्यासाठी फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन 'अनइन्स्टॉल अपडेट्स' या पर्यायावर क्लिक करू शकतात
गोंधळून जाऊ नका. हे गुगल फोन अॅपच्या अपडेटमुळे झाले आहे. जर तुम्हाला अजूनही फोनमधील जुनी स्टाईल (शैली) आवडत असेल, तर नवीन अपडेट्स अनइन्स्टॉल करा
Honey Trap करणारी 'ती' पहिली सौंदर्यवती कोण ? इतिहासात तिच्यासोबतच्या कहाण्या अधिकारी, लष्करी अधिकारी देखील रंगवून सांगायचे. | pudhari photo