Namdev Gharal
Sebright chiken ही इंग्लडमधील अशी कोंबडी आहे की जिचे पंख पेटिंग काढल्यासारखे असतात. पिसांचा पॅटर्न एकसुरी आणि अत्यंत आकर्षक असतो.
अगदी चित्र काढल्यासारखा या कोंबडीचा रंग असतो. ही एक लहान आकाराची शोभेची कोंबडी आहे.
ती अंड्यांसाठी किंवा मांसासाठी नव्हे, तर प्रामुख्याने सौंदर्यासाठी आणि प्रदर्शनासाठी पाळली जाते.
या कोंबडीचे ब्रिड इंग्लंडमध्ये 19व्या शतकाच्या सुरुवातीस तयार झाले. ही जात Sir John Sebright यांनी तयार केली, म्हणून तिचे नाव “Sebright” ठेवले गेले.
Sebright कोंबडीचे पंख अतिशय सुंदर, चमकदार आणि काळ्या किनारीने सजलेले असतात. त्यामुळे ती अत्यंत आकर्षक दिसते.
या कोंबडीमध्ये दोन प्रमुख रंगप्रकार आहेत: Golden Sebright (सोनरी रंग) व Silver Sebright (चंदेरी रंग)
यातील नराचे वजन नर (cock): सुमारे 600–700 ग्रॅम तर मादीचे वजन (hen): सुमारे 500–600 ग्रॅम असते
या कोंबड्या खूप कमी अंडी देतात दरवर्षी 60–80 लहान अंडी. त्यामुळे त्यांचा उपयोग अंडी उत्पादनासाठी केला जात नाही.
त्यांचे पंख बारीक व चमकदार असल्याने त्यांना थंड वातावरणात विशेष काळजी घ्यावी लागते. स्वच्छ वातावरण व संतुलित आहार आवश्यक असतो.
Sebright ही जगभरात सौंदर्य प्रदर्शनासाठी अतिशय लोकप्रिय जात आहे. अनेक देशांमध्ये या जातीला “Ornamental Breed” म्हणून ओळखले जाते.
नर कोंबड्यांमध्ये इतर जातींप्रमाणे लांब शेपटीचे किंवा मोठे पंख नसतात. नर आणि मादी दोघेही जवळजवळ सारखेच दिसतात, हे यांचे दुर्मिळ वैशिष्ट्य आहे.