Namdev Gharal
सेक्रेटरी बर्ड हा उंच पाय असलेला एक शिकारी पक्षी आहे. हा पक्षी फक्त आफ्रिकेमध्ये आढळतो
याची उंची ४ फुटांपर्यंत असते. याला सापांचा सर्वात ‘जानी दुश्मन’ मानले जाते. Sagittarius serpentarius असे याचे वैज्ञानिक नाव आहे
याला Secretary Bird हे नाव त्याच्यास शारिरीक वैशिष्ठ्यावरुन मिळाले आहे. याच्या डोक्यावर पिसांचा "पेनसारखा" तुरा असतो यामुळे याला सेक्रेटरी बर्ड असं नाव मिळालं
साप दिसला की हा पक्षी आपल्या पायांनी तो एवढ्या जोरात किक मारत सुटतो (तिक्ष्ण नखांनी तुडवतो) की सापाचा तडफडून मृत्यू होतो.
साप मारण्यात याची विशेष प्रसिद्धी आहे — तो सापाला पायांनी ठोसे मारून ठार करतो. व साप खातो यासह लहान सस्तन प्राणी, कीटक, सरडे, उंदीर इ. याचे अन्न् आहे.
सापाची शिकार करताना हा आपले पंख फैलावून अंत्यत त्वेषाने त्याच्यावर वार करतो. तसेच जलद गतीने हालचाली करतो यामुळे सापाने जरी वार केला तरी तो सहज चुकवतो.
हा पक्षी सवाना मैदान, गवताळ प्रदेश आणि उघड्या मैदानी भागांमध्ये राहतो — विशेषतः सहारा वाळवंटाच्या खालच्या आफ्रिकेत हा मोठ्या प्रमाणात आढळतो.
याची उंची साधारणपणे १.३ मीटर (४ फूट) इतकी असते आणि पंखांची लांबी २ मीटरपर्यंत असते.
याचे शारिरीक वैशिष्ठ्य म्हणजे लांबलचक पाय, राखाडी शरीर, काळे पंख. हा पक्षी उडू शकतो पण बहुतेक वेळा जमिनीवर चालत शिकार करतो.
उंच झाडांवर (विषेशतः काटेरी) मोठं घरटं बांधतो, आणि त्यात १–३ अंडी घालतो. दोन्ही पालक मिळून पिल्लांची काळजी घेतात.
Secretary Bird हा सुदान या आफ्रिकेतील देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे आणि देशाच्या प्रतीकातही दिसतो.