पुढारी वृत्तसेवा
सी बकथॉर्न हे हिमालय, लडाखजध्ये उगवणारी औषधी वनस्पती आहे.
या झाडाच्या लहान, केशरी-पिवळ्या रंगाच्या फळांना 'लेह बेरी' (Leh Berry)/'वंडर बेरी' असे म्हणतात.
यामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात.
यात संत्र्यापेक्षा कैक पटीने जास्त व्हिटॅमिन सी असते
यात ओमेगा-७, व्हिटॅमिन ई, अँटिऑक्सिडंट्स असतात
जे त्वचेची चमक टिकवून ठेवण्यास तसेच अँटीएजिंग म्हणून काम करते.
शरीराला ताजेतवाने ठेवण्यासाठी आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी हे उपयुक्त आहे.
यातील घटक कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रात ठेवण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.
याचा ज्युस किंवा सिरप सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यातून किंवा मधासोबत घेतला जातो
सी बकथॉर्नची पाने किंवा फळांचा अर्क घालून चहा बनवून पितात
स्किन केअरसाठी याचे शुद्ध तेल थेट चेहऱ्यावर लावले जाते