पुढारी वृत्तसेवा
साहित्य-खपली गहू १ वाटी, किसलेला गुळ गोडीनुसार, तूप ३ मोठे चमचे
किसलेले ओले खोबरे १ वाटी, ड्रायफ्रूट्स, पाणी ३ वाटी, वेलची-जायफळ पूड
कृती- खपली गहू स्वच्छ धुवून घेऊन कुकरमध्ये तूप, गहू, ३ वाटी पाणी घालून शिट्ट्या काढा
एका जाड बुडाच्या पातेल्यात २ चमचे साजूक तूप टाकून काजू, बदाम, मनुका परतून घ्या
त्याच तुपात शिजलेला खपली गहू २ मिनिटे मंद आचेवर छान खमंग परतून घ्या.
गव्हामध्ये दीड वाटी गरम पाणी घालून मिश्रण चांगले उकळून घ्या
गॅस मंद आचेवर ठेवून किसलेला गुळ घालून तो पूर्णपणे विरघळवून घ्या.
त्यात ताजे नारळाचे दूध वापरा, ज्यामुळे खीर सुंदर लागते आणि नासण्याचा प्रश्नच नसतो.
दूध घालणार असल्यास ते थंड करून मगच टाका, नाहीतर खीर फाटण्याची शक्यता असते
वेलची-जायफळ पूड आणि उरलेले तूप-ड्रायफ्रूट्स वरून घाला.