Tea In Summer: उन्हाळ्यात 'गरम' चहा थंडावा कसा देतो; सायन्स काय सांगतं?

Anirudha Sankpal

'जर्नल ऑफ फिजिओलॉजिकल सायन्सेस'मधील संशोधनानुसार, गरम चहा प्यायल्याने शरीराचे अंतर्गत तापमान किंचित वाढते.

हे तापमान वाढताच मेंदूला सिग्नल मिळतो आणि शरीर स्वतःला थंड करण्यासाठी वेगाने घाम (Sweat) बाहेर टाकू लागते.

जेव्हा हा घाम त्वचेवरून हवेत विरघळतो (Evaporation), तेव्हा तो शरीरातील उष्णताही सोबत घेऊन जातो, ज्यामुळे आपल्याला थंडावा जाणवतो.

चहामधील आले आणि वेलची यांसारखे मसाले केवळ चव वाढवत नाहीत, तर उन्हाळ्यात पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासही मदत करतात.

ही 'कूलिंग ट्रिक' केवळ दिल्ली किंवा राजस्थानसारख्या कोरड्या हवामानातच प्रभावी ठरते, जिथे घाम लवकर सुकू शकतो.

मुंबई किंवा कोकणासारख्या दमट (Humid) हवामानात घाम सुकत नसल्याने तिथे चहा प्यायल्याने अधिक अस्वस्थता जाणवू शकते.

अतिशय उकळता चहा पिणे टाळावे, कारण यामुळे घसा आणि अन्ननलिकेला इजा होण्याची शक्यता असते.

कोल्ड ड्रिंक्समुळे शरीराचे तापमान अचानक कमी होऊन शरीराला धक्का (Shock) बसतो, जो अल्पकाळासाठीच असतो.

Cold drink gas release science

याउलट, चहा शरीरातील नैसर्गिक कूलिंग सिस्टम सक्रिय करून दीर्घकाळ शरीराला थंडावा देण्यास मदत करतो.

येथे क्लिक करा