पुढारी वृत्तसेवा
इटलीतील 'आयएमटी स्कूल फॉर ॲडव्हान्स्ड स्टडीज लुका' येथील संशोधकांनी स्वप्ने म्हणजे मेंदूतील टाकाऊ विचार असतात, हा दावा खोडून काढला आहे.
संशोधकांनी ३,७०० हून अधिक स्वप्नांच्या अहवालांचे विश्लेषण केले.
'कम्युनिकेशन्स सायकॉलॉजी'मध्ये प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासानुसार, स्वप्ने ही आपली समज, भावना आणि परिस्थिती यावर आधारित एक व्यवस्था आहे.
या अभ्यासासाठी १८ ते ७० वयोगटातील २८७ सहभागींकडून ३,७०० हून अधिक स्वप्ने आणि त्यांच्या जागृत अवस्थेतील अनुभवांची माहिती गोळा करण्यात आली.
या माहितीच्या विश्लेषणासाठी प्रगत 'नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग' (NLP - कृत्रिम बुद्धिमत्तेचा एक प्रकार) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.
संशोधनातून असे दिसून आले की स्वप्ने योगायोगाने पडत नाहीत, तर त्यामागे विशिष्ट नमुने असतात.
स्वप्ने आपल्या आंतरिक गुणांचे आणि बाह्य प्रभावांचे मिश्रण असतात.
जे लोकं दिवसा अधिक विचार कतात त्यांना विखुरलेली आणि झपाट्याने बदलणारी स्वप्ने पडतात.
जे लोक स्वप्नांकडे अर्थपूर्ण दृष्टीने पाहतात, त्यांना अधिक जिवंत आणि वास्तववादी स्वप्ने पडतात.
अभ्यासाच्या प्रमुख लेखिका एल्से म्हणतात, "स्वप्ने ही आपण कोण आहोत आणि आपण कोणत्या परिस्थितीतून जात आहोत, यानुसार आकार घेणारी प्रक्रिया आहे."