पुढारी वृत्तसेवा
हिवाळी म्हणजे सहलीचे दिवस. मुलांसाठी फिरायला पर्वणीच. याच दिवसांमध्ये शालेय सहलींचे आयोजन केले जाते
सहलीसाठी जाताना मुलांनी खालील सोप्या टीप्स लक्षात ठेवल्यास फिरण्याचा आनंद मनमुरादपणे लुटाल.
मुलांनी सर्व आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्राथमिक औषधे बरोबर घ्यावीत. यामध्ये ताप, उलटी, मळमळ यावरील गोळ्या सोबत असाव्यात.
शाळेने दिलले आयडी कार्ड आपल्यासोबत ठेवावे.
सोबत छोटी डायरी ठेवा. यामध्ये आपल्या आईवडिलांसह शिक्षकांचाही नंबरची नोंद असावी.
हवामानानुसार कपडे सोबत ठेवा. थंडीचे दिवस असल्याने उबदार कपडे मस्टच.
पाण्याची बाटली सोबत असावीच. शक्य असल्यास अतिरिक्त छोटी बाटली ठेवा.
आवश्यक असल्यास थोडेसे खिशातले पैसे ठेवा; पण त्याची सतत काळजी घ्या.
मोबाईल फोनसंदर्भात शाळेचे नियमांचे पालन करा.
शिक्षकांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा; आपल्या गटापासून दूर जाऊ नका.
सहलीत पर्यावरणाची काळजी घ्या. कचरा इथे-तिथे टाकू नका.