Marabou Stork | 25 वर्षे जगणारा भयावह पक्षी, फक्त सडलेले मांस खातो

Namdev Gharal

मॅराबू सारस हा जगातील एक विद्रुप पक्षी आहे. जो पंचवीस वर्षे जगू शकतो आणि तो फक्त सडलेले कुजलेले मांस खातो

त्‍याचे डोके टक्कल पडल्यासारखे असते त्‍याच्यावर पिसे नसतात, तसेच त्‍याच्या गळ्यात एक मांसाची पिशवी लोंबत असते.त्‍याचे हे रुप त्‍याला विद्रुप पक्षी ठरवते

त्‍यांची उंची पाच फुटापर्यंत असते त्‍यामुळे तो भयावह असून, दिसायलाही महाकाय असतो

त्याच्या विचित्र स्वरूपामुळे त्‍याला 'अंडरटेकर' असेही म्हणतात. मागून पाहिल्यास तो एखाद्या काळ्या कोट घातलेल्या माणसासारखा दिसतो.

हा जगातील सर्वात मोठ्या उडणाऱ्या पक्षांपैकी एक आहे. याच्या पंखाचा आकार 10 ते 12 फुटांपर्यंत असतो

या पक्षाच्या गळ्याखाली एक मोठी गुलाबी रंगाची पिशवी लटकलेली असते याचा वापर तो जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी आणि आवाज काढण्यासाठी करतो.

हा पक्षी मुख्यत्वे मेलेल्या प्राण्यांचे मांस (Carcasses) खातो. गिधाडांप्रमाणेच हा पक्षी पर्यावरणातील घाण साफ करण्याचे महत्त्वाचे काम करतो.

मॅराबू स्टॉर्कचे पाय नैसर्गिकरित्या काळे असतात, पण ते नेहमी पांढरे दिसतात. याचे कारण म्हणजे स्वतःच्या शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी तो पायावरच विष्ठा करतो.

याची चोच अतिशय मजबूत आणि मोठी असते. मेलेल्या प्राण्यांचे कडक मांस फाडण्यासाठी आणि स्वरक्षणासाठी तो या चोचीचा वापर करतो.

कुत्र्याचें शेपूट वाकडेच का?