Dog Curly Tail |कुत्र्याची शेपूट वाकडीच का? रहस्य दडलयं उत्‍क्रांतीत!

Namdev Gharal

आपण सहज पाहतो की कुठलाही कुत्रा असूदे पाळीव किंवा भटका एक गोष्ट विषेशत्‍वाने जाणवते ते म्हणजे त्‍याची शेपूट नेहमीच वाकडी असते

यावरुन मराठीत तर ‘कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच' अशी म्हणही पडली आहे. कारण काहीही केले तरी ते शेपूट आहे तशीच राहते. माणसाच्या स्वभाववैशिष्ट्यांसाठी ही म्हण वापरली जाते

पण तुम्हाला हे माहिती आहे का कुत्र्याची शेपूट कधीपासून वाकडी झाली. तर लांडग्यापासून कुत्रा जसा उत्‍क्रांत होत गेला तशी त्‍याची काही शरीरवैशिष्ट्ये ठळक होत गेली. म्हणजेच उत्‍क्रांतीकाळातच हा बदल झाला आहे.

कुत्र्यांची शेपूट वाकडी असण्यामागे काही महत्त्वाची शास्त्रीय कारणे देखील आहेत उत्‍क्रांत काळात कुत्रा जेव्हा माणसाच्या जवळ येत गेला त्‍यावेळी त्‍याच्या शरीरात बदल होत गेले

संशोधकांच्या मते, कुत्र्यांच्या शरीरातील काही विशिष्ट पेशी (Neural Crest Cells) त्‍याच्या स्वभावातील आक्रमकपणा कमी होण्यासाठी कारणीभूत ठरल्या. त्‍याचा स्वभाव काहीसा मवाळ झाला

या पेशींचा परिणाम केवळ त्यांच्या स्वभावावरच नाही, तर त्यांच्या शारीरिक रचनेवरही झाला. यामुळेच कुत्र्यांचे कान लवचिक होणे आणि शेपूट वाकडी होणे यासारखे बदल दिसून आले

कुत्र्यांच्या शेपटीच्या आकारासाठी 'T-Box' नावाचे जनुक जबाबदार असते. या जनुकांमुळे काही कुत्र्यांची शेपटी अधिक वाकडी किंवा आखूड असू शकते

दुसरी गोष्ट म्हणजे त्‍याची शेपूट म्हणजे माणसाला संकेत किंवा संवाद साधण्यासाठीही उपयुक्त ठरु लागली. शेपूट हलवणे हे संवाद साधताना अधिक स्पष्टपणे 'सिग्नल' देण्यास मदत करते

दुसरी गोष्ट म्हणजे कुत्र्यांच्या शेपुटीच्या मुळाशी 'अ‍ॅनल ग्लँड्स' (Anal Glands) असतात, ज्यातून विशिष्ट वास येतो. शेपूट उंचावलेली असल्यास हा वास तीव्रतेने पसरतो, ज्यामुळे कुत्रा आपला 'इलाका' (Territory) ठरवतो.

कुत्र्यांच्या शेपटीचे हाड आणि त्याभोवतीचे स्नायू जन्मतःच अशा प्रकारे विकसित झालेले असतात की ती शेपूट सरळ राहू शकत नाही.

काही जण कुत्र्यांची शेपूट कापतात किंवा सरळ करण्यासाठी उपाय करतात पण बायॉलॉजिकल हा कुत्र्यांसाठी अधिक त्रासदायक ठरतो.