Self-Love Tips|फक्त स्वतःला 'थँक्यू' म्हणा! आयुष्यात कोणते मोठे बदल होतात ते तुम्हीच पाहा

पुढारी वृत्तसेवा

स्वतःला 'थँक्यू' म्हणणे अतिशय छोटी पण मनाला सकारात्मक ऊर्जा देणारी सवय आहे

जेव्हा आपण इतर सर्वांचे आभार मानतो, पण स्वतःला पूर्णपणे विसरून जातो

तेव्हा स्वतःचे आभार मानणे एक जादूचे काम करते.

आपण सहसा इतरांच्या चुका माफ करतो पण स्वतःबद्दल फार विचार करत नाही

स्वतःचे आभार मानल्याने स्वतःबद्दलची टीका कमी होते

स्वतःचा जसा आहे तसा स्वीकार करण्याची भावना वाढीस लागते.

दिवसभरातील आव्हानांचा सामना, जे कष्ट घेतो, त्याची पोचपावती आपण स्वतःला देतो

सतत स्वतःला धावण्यात, कामात झोकून दिल्यावर जेव्हा आपण स्वतःसाठी थांबून 'थँक्यू' म्हणतो

बाह्य जगाकडून कौतुकाच्या अपेक्षेपेक्षा स्वतःची पाठ थोपटणे अधिक चांगले

स्वतःला धन्यवाद देण्याचा हा अनुभव स्वतःशी जोडून घेण्याचा सर्वात सुंदर मार्ग आहे.

मग, तुम्ही स्वतःला म्हणाल ना! Thank You...

Diary Writing Benefits:'जेव्हा मनातील गोष्टी कागदावर उतरतात', रोजनिशी- डायरी लिहिण्याची सवय आयुष्य कशी बदलू शकते?