‘धुरंधर’मध्ये रणवीरसोबत 20व्या वर्षी झळकणाऱ्या सारा अर्जुनची संपत्ती किती?

पुढारी वृत्तसेवा

'धुरंधर'मधील नवीन हिरोईन चर्चेत आहे. सारा अर्जुनने रणवीर सिंगसोबत बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे.

Sara Arjun | Pudhari

सारा अर्जुनचा 18 जून 2005 रोजी मुंबईत जन्म झाला. ती लहानपणापासून अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. तिचे वडील अभिनेता राज अर्जुन आहेत.

Sara Arjun | Pudhari

तिने 5 वर्षांपूर्वीच 100+ जाहिराती केल्या आहेत. 2011 मध्ये 'दैव तिरुमगल' चित्रपटातून तिला ओळख मिळाली.

Sara Arjun | Pudhari

सारा अर्जुन कधीकाळी भारतातील सर्वात श्रीमंत बालकलाकार होती. तिची अंदाजे नेटवर्थ 10 कोटी+ आहे.

Sara Arjun | Pudhari

एक थी डायन, जज्बा मध्ये तिने काम केलं आहे. ऐश्वर्या रायसोबतही तिने स्क्रीन शेअर केली आहे. पोन्नियिन सेल्व्हन मध्येही तिने जबरदस्त भूमिका केली होती.

Sara Arjun | Pudhari

धुरंधरमध्ये ती रणवीर सिंगसोबत मुख्य भूमिकेत आहे. दिग्दर्शक आदित्य धरने (URI फेम) या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

Sara Arjun | Pudhari

या चित्रपटात रणवीर सिंग, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांसारखे मोठे कलाकार आहेत.

Sara Arjun | Pudhari

रणवीर (40) आणि सारा (20) यांच्या वयातील अंतरावर सोशल मीडियावर चर्चा होत होती.
काहींना दोघांची केमिस्ट्री आवडली, तर काहींना आवडली नाही.

Sara Arjun | Pudhari

Malaika Arora: पन्नाशीतही 'तुकतुकीत' त्वचेसाठी मलायकाची खास वॉटर थेरपी

Malaika Arora fitness | Instagram
येथे क्लिक करा