Sanju Samson: वर्ल्डकप जिंकायचाय... केरळचा एकजण तरी पाहिजेच भाऊ!

Anirudha Sankpal

भारताच्या वर्ल्डकप विजयात संजू सॅमसनचा सिंहाचा वाटा होता. त्यानं फायनलमध्ये ८९ धावांची तडाखेबाज खेळी केली.

केरळचा हा क्रिकेटपटू अगदी शेवटच्या टप्प्यात वर्ल्डकप संघात आला होता. त्याला संपूर्ण स्पर्धेत फक्त काहीच सामने खेळण्याची संधी मिळाली.

तरी देखील संजूनं मोठा धमाका केला. केरळच्या खेळाडूंचा आणि भारताच्या वर्ल्डकप विजयाचे एक खास कनेक्शन आहे.

भारतानं ज्यावेळी १९८३ ला पहिला वर्ल्डकप जिंकला त्यावेळी भारतीय संघात केरळच्या सुनिल वाल्सन यांचा समावेश होता.

त्यानंतर २००७ मध्ये भारतानं पहिल्या टी २० वर्ल्डकपवर नाव कोरलं. त्यावेळी एस श्रीसंत हा केरळचा खेळाडू भारतीय संघात होता.

२०११ च्या विश्वविजेत्या संघात देखील केरळचा एस. श्रीसंत देशाचं प्रतिनिधित्व करत होता. दोन्ही वेळा एमएस कर्णधार होता.

यानंतर ज्यावेळी भारतानं २०२४ चा टी २० वर्ल्डकप जिंकला त्यावेळी संजू सॅमसन भारतीय संघाचा सदस्य होता.

आता तर २०२६ मध्ये भारताच्या विश्वविजेते होण्यात संजूनं सिंहाचा वाटा उचलला. म्हणजेच काय तर वर्ल्डकप जिंकायचाय तर केरळचा एक तरी खेळाडू संघात हवाच असा हा योगायोग!

येथे क्लिक करा